October 22, 2025 8:15 PM October 22, 2025 8:15 PM

views 42

महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत – न्यूझीलंड सामना

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.    गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश करण्याच्यादृष्टीनं हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.    दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे.

October 9, 2025 1:39 PM October 9, 2025 1:39 PM

views 81

Womens World Cup : भारत – दक्षिण आफ्रिका आमनेसामने

महिला क्रिकेट मधे ट्वेंटीट्वेंटी  विश्व चषक स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. विशाखापट्टणम् इथं दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल. या स्पर्धेत सलग दोन सामने भारतानं जिंकले आहेत. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३७व्या षटकापर्यंत केवळ ११४ धावाच करू शकला.

October 5, 2025 8:19 PM October 5, 2025 8:19 PM

views 56

Women’s World Cup: भारताचं पाकिस्तानपुढं विजयासाठी २४८ धावांचं आव्हान

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं सुरु असलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानपुढं विजयासाठी २४८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या. हरलीन देओलनं सर्वाधिक ४६ धावा केल्या. रिचा घोषनं नाबाद ३५ धावांचं योगदान दिलं.

October 1, 2025 9:32 AM October 1, 2025 9:32 AM

views 60

Women’s World Cup : श्रीलंकेचा पराभव करून भारताची विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारतानं ४७ षटकांमध्ये २६९ धावा केल्या. अमनज्योत कौरनं ५७ धावा करून भारताची बाजू मजबूत केली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळं भारताची धावसंख्या २७० अशी निश्चित करून श्रीलंकेपुढे विजयासाठी २७१ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. मात्र, श्रीलंकेचा संघ ४५ षटकं आणि चार चेंडूंमध्ये सर्वबाद २११ धावाच करू शकला. आता भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यानचा बहुप्रतीक्षित सामना कोलंबोमध्ये रविवारी होणार आहे.