January 28, 2025 3:47 PM January 28, 2025 3:47 PM

views 16

महिलांच्या १९ वर्षाखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा १५० धावांनी विजय

१९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर सिक्स गटाच्या अंतिम सामन्यात भारताने स्कॉटलंडवर दीडशे धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत केवळ ५८ धावांवरच गडगडला. स्कॉटलंडची सुरुवात ही चाचपडत झाली. अवघ्या १३ धावांवर पिप्पा केली हिच्या रुपाने स्कॉटलंडला पहिला झटका बसला. त्यानंतर  स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. भारताच्या आयुषी शुक्लानं चार गडी बाद केले. तर वैष्णवी शर्मा आणि गोंगदी त्रिशा यांनी प्र...