June 27, 2025 3:44 PM June 27, 2025 3:44 PM

views 8

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत पुरुष गटातल्या विजेतेपदासाठी महाराष्ट्राची तामिळनाडूशी लढत

हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील अंतिम सामने आज दुपारी चेन्नईत होणार आहे. पुरुष गटात तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या संघाची लढत आज दुपारी चार वाजता होणार आहे. महिलांच्या गटातील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज झालेल्या सामन्यात हरयाणानं यजमान तमिळनाडूचा ४-३ असा पराभव केला. तर पुरुषांच्या गटात चंदीगढनं ओदिशावर २-१ अशी मात करत तिसरा क्रमांक मिळवला.