October 21, 2024 10:15 AM October 21, 2024 10:15 AM

views 12

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडने जिंकले विश्वविजेतेपद

महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, न्यूझीलंडनं सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून प्रथमच हा विश्वचषक जिंकला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर काल रात्री झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित वीस षटकांत नऊ गडी गमावून 126 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं निर्धारित 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या. अमेलिया केरला मालिकावीर आणि सामनावीर दोन्ही पुरस्कार घोषित करण्यात आले.

October 14, 2024 2:26 PM October 14, 2024 2:26 PM

views 10

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना

महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी साडे ७ वाजता सामना होणार आहे.   पाकिस्तान हा सामना जिंकला तर भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करायची संधी मिळेल. अ गटात ऑस्ट्रेलियानं काल भारतीय संघाला पराभूत केलं. त्यामुळं उपांत्य फेरीतली त्यांची जागा निश्चित झाली आहे.

October 10, 2024 8:55 AM October 10, 2024 8:55 AM

views 17

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर विजय

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर काल दुबई इथं 82 धावांनी विजय मिळवून एक विक्रम केला. त्यामुळं अ गटात भारत क्रमवारी आणि धावसंख्येच्या प्रमाणात वरचढ ठरला आहे. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धना यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतानं केलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ विसाव्या षटकात सर्वबाद 90 धावा करु शकला.  

October 8, 2024 11:09 AM October 8, 2024 11:09 AM

views 15

महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार

महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यापुर्वी सामन्यात दोन्ही संघांनी आपले सुरुवातीचे सामने जिंकले होते. तत्पूर्वी, काल शारजाह इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला निर्धारित वीस षटकांत केवळ 124 धावा करता आल्या. कर्णधार लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक 42 धावा केल्या.  

October 5, 2024 10:12 AM October 5, 2024 10:12 AM

views 17

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला

दुबईतल्या शारजा इथे सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूझीलंडनं भारताचा ५८ धावांनी पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा १० गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत अ गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका तर ब गटात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे.

October 1, 2024 2:45 PM October 1, 2024 2:45 PM

views 13

महिला टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वसराव सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंका विजयी

महिला टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वसराव सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंकेला विजय प्राप्त झाला आहे. बांग्लादेशनं पाकिस्तानला १४० धावांचं लक्ष्य दिलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११७ धावाच करू शकला. श्रीलंकेनं स्कॉटलंडला ५ गडी राखून पराभूत केलं. स्कॉटलंडनं प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत केवळ ५९ धावा केल्या. श्रीलंकेनं ५ गड्यांच्या मोबदल्यात १५ षटकं आणि ३ चेंडूंमध्ये ही धावसंख्या पूर्ण केली.