November 23, 2025 6:56 PM November 23, 2025 6:56 PM
39
महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल
महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इराणचा ३३-२१ अशा गुणफरकाने पराभव केला. भारताकडून पूजा, संजू आणि सोनाली शिंगटे यांनी दिमाखदार चढाया करून गुण मिळवले तर साक्षी आणि रितू नेगी यांनी पकड करून इराणच्या खेळाडूंना गुण मिळवण्यापासून रोखलं. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चिनी तैपेई आणि बांगलादेश यांच्यात होत असून यातल्या विजेत्या संघाबरोबर अंतिम फेरीत भारताची गाठ पडेल.