December 14, 2024 1:46 PM December 14, 2024 1:46 PM
3
महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर
महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं ही स्पर्धा होत असून गेल्या गुरुवारी थायलंडवर भारताने ९ - ० असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे भारत उपांत्यफेरीत पोहोचला, तसंच पुढच्या वर्षी चिलीमधे होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ गट जागतिक हॉकी स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला आहे. आजचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होईल. दुसरा उपान्त्य सामना चीन आणि दक्षिण कोरियामधे होणार आहे.