January 13, 2025 2:28 PM January 13, 2025 2:28 PM
4
महिला हॉकी इंडिया स्पर्धेत आज जेएसडब्ल्यू सूरमा हॉकी क्लब विरुद्ध श्राची रार बंगाल टायगर्स या संघांमध्ये होणार सामना
महिला हॉकी इंडिया स्पर्धेत आज जेएसडब्ल्यू सूरमा हॉकी क्लब विरुद्ध श्राची रार बंगाल टायगर्स या संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा मैदानावर संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेला सुरुवात झाली असून सलामीच्या लढतीत ओदिशा वॉरियर्सने दिल्ली एसजी पायपर्सचा ४-० असा पराभव केला. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज संध्याकाळी तामिळनाडू ड्रॅगन्सचा सामना दिल्ली एसजी पायपर्स संघाशी होणार आहे. राऊरकेला इथल्या बिरसा मुंडा हॉकी मैदानावर रात्री सव्वा आठ वाजता सामना सुरू होईल.