December 17, 2024 2:58 PM

views 16

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राजस्थानमधल्या वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा इथं  ७  ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघानं एम. एल. एस.  विद्यापीठ, उदयपुर  संघाला  ६-० नं हरवलं.  या स्पर्धेत ४५ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते.