July 18, 2024 3:05 PM July 18, 2024 3:05 PM

views 13

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या दाम्बुला इथं सुरू

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरू होत आहे. सलामीचा सामना गट ‘अ’ मधल्या नेपाळ आणि संयुक्त अरब अमीराती या संघात होणार आहे. त्यानंतर गतविजेता भारतीय संघाची लढत क्रिकेटमधला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. भारतीय महिला संघाने २०१८ चा अपवाद वगळता टी ट्वेंटी क्रिकेटच्या सर्व मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे आपलं जेतेपद राखण्याचं आव्हान भारतासमोर असेल. मालिकेतले सर्व सामना रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.    

July 10, 2024 10:57 AM July 10, 2024 10:57 AM

views 10

टी-२० महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १० गडी राखत विजय

भारत आणि दक्षिण अफ्रिके दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या 20 षटकांच्या महिला क्रिकेट सामन्यात तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघानं 10 गडी राखून पाहुण्या संघावर दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी 85 धावांचं लक्ष्य भारतीय खेळाडूंनी केवळ 10 षटकं आणि 6 चेंडूत पार केलं. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. कालचा सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखली. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारला तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तर संपूर्ण मालि...

July 5, 2024 1:55 PM July 5, 2024 1:55 PM

views 15

महिला क्रिकेट मधे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज चेन्नईत रंगणार

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ३ टी-२० सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळाला जाणार आहे. चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडिअमवर आज संध्याकाळी ७ वाजता हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत.   भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय महिलांनी पाहुण्या संघाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० नं पराभूत केलं होतं, तर दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं १० गड...

July 1, 2024 1:14 PM July 1, 2024 1:14 PM

views 16

महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०५ धावांची आघाडी

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे १०५ धावांची आघाडी आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर संपुष्टात आला असून, त्यांना फॉलो ऑन मिळाला. स्नेहा राणा हिनं ८ बळी घेऊन इतिहास घडवला, तर दीप्ती शर्मानं २ खेळाडू बाद केले. कालचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दोन बाद २३२ धावा झाल्या होत्या.

June 29, 2024 7:41 PM June 29, 2024 7:41 PM

views 13

भारत ठरला महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ३६७ धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज सकाळच्या पहिल्या सत्रातच भारतानं आपला पहिला डाव कालच्या ४ बाद ५२५ धावांवरून पुढे सुरु केल्यानंतर विक्रमी ६ बाद ६०३ धावांवर घोषित केला. ही महिला कसोटी क्रिकेटमधील आजवरची सर्वोच्च सांघिक धावसंख्या असून, भारत महिला कसोटी क्रिकेटमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला संघ ठरल...

June 19, 2024 7:47 PM June 19, 2024 7:47 PM

views 57

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत लढत

महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरु इथं सुरू आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बळींच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ षटकात तीन बळींच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या होत्या.  

June 17, 2024 10:01 AM June 17, 2024 10:01 AM

views 17

महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे बंगळुरु इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकात आठ बाद २६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८ व्या षटकातच १२२ धावात सर्वबाद झाला.