June 16, 2025 2:24 PM June 16, 2025 2:24 PM
6
महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखा जाहीर
आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखांची घोषणा केली आहे. या स्पर्धेची सुरुवात येत्या ३० सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेची उपांत्य फेरी २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी होणार असून अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. स्पर्धेतला बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना श्रीलंकेत आर. प्रेमदासा स्टेडियमवर दु...