March 15, 2025 12:49 PM March 15, 2025 12:49 PM
13
महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना
महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.