December 30, 2025 8:38 PM December 30, 2025 8:38 PM

views 2

भारतीय महिलांकडून श्रीलंकेला १७६ धावांचं आव्हान

श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिरुवनंतपुरममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर शफाली वर्मा ५ धावा बाद झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं भारतीय फलंदाज बाद होत राहिल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनं मात्र भारताचा डाव सावरला. ९ चौकार आणि १ षटकारच्या जोरावर तिनं ४३ चेंडून ६८ धावा...

October 31, 2025 12:24 PM October 31, 2025 12:24 PM

views 63

भारताच्या महिला संघाची आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताच्या महिला क्रिकेट संघानं आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नवी मुंबईत काल झालेल्या थरारक उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ फलंदाज राखून मात केली. ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३३९ धावांचं लक्ष्य भारताच्या संघानं ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ९ चेंडू राखून पूर्ण केलं.   नाणेफेक जिंकून प्रधम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९ षटकं आणि ५ चेंडूंत ३३८ धावा करून माघारी परतला. फीबी लिचफील्ड हिनं ११९ धावांची खेळी केली, तर किम गार्थ आणि ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन ...

September 21, 2025 9:32 AM September 21, 2025 9:32 AM

views 73

महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधला ५० षटकांचा तिसरा आणि निर्णायक सामना काल ऑस्ट्रेलियानं ४३ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं २-१ असा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं ४८ षटकांत सर्व गडी बाद ४१२ धावा केल्या. विजयासाठी ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचे सर्व फलंदाज ३६९ धावांवर बाद झाले.  

July 23, 2025 10:07 AM July 23, 2025 10:07 AM

views 10

Women’s Cricket : भारताचा इंग्लंडवर २-१ असा विजय

तीन सामन्यांच्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा १३ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं दमदार फलंदाजी करत, निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३१८ धावा केल्या आणि यजमान इंग्लंडसाठी ३१९ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताची कर्णधार हरमनप्रीतने ८४ चेंडूत १०२ धावा केल्या. या आधी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकल्यानं हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. इंग्लंडच्या संघाला ४९ षटकं आणि पाच चे...

July 10, 2025 9:32 AM July 10, 2025 9:32 AM

views 12

महिला T20 पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांदरम्यान ब्रिटनमध्ये काल झालेल्या मर्यादित 20 षटकांच्या चौथ्या सामन्यात, भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 20 षटकांत 7 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारतीय महिलांनी केवळ 17 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले, सलामीवीर स्मृती मानधनाने 32 धावा आणि शफाली वर्माने 31 धावांचे योगदान दिलं.

January 23, 2025 8:42 PM January 23, 2025 8:42 PM

views 13

U19WC : भारताचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय

एकोणीस वर्षांखालच्या महिला क्रिकेट टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय मिळवला. सुरुवातीला, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून ११८ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या २४ चेंडूत अवघ्या १२ धावात त्यांच्या ५ फलंदाज तंबूत परतल्या. २० षटकात ९ गडी गमावून  त्यांना फक्त ५८ धावाच करता आल्या. 

January 10, 2025 8:26 PM January 10, 2025 8:26 PM

views 33

महिला क्रिकेटमधे भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत भारताचा विजय

  महिला क्रिकेटमधे भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं सहा गडी, आणि ९३ चेंडू राखून विजय मिळवला. आयर्लंडन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात फक्त ७ गडी गमावून २३८ धावा केल्या.. कर्णधार गॅबी लुईसनं ९२ तर लीह पॉलनं ५९ धावा केल्या. भारतातर्फे प्रिया मिश्रानं २, तर सायली सातघरे, दिप्ती शर्मा, टायट्स साधू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.    विजयासाठी २३९ धावांचं लक्ष्य भारतानं ३५ व्या षटकातच ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केल...

December 27, 2024 7:13 PM December 27, 2024 7:13 PM

views 18

महिला क्रिकेटमधे भारताचा ३-० असा मालिका विजय

भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.  वडोदरा इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३८ षटकात सर्वबाद १६२ धावा केल्या. भारतानं अवघ्या २८ षटकांत १६७ धावा करत विजयी लक्ष्य पार केलं.    भारताच्या विजयात दिप्ती शर्माच्या भेदक गोलंदाजीचा मोठा वाटा आहे. दिप्तीनं ३१ धावांच्या बदल्यात सहा गडी बाद केले. तिला प्लेअर ऑफद मॅच तर रेणुका सिंह ठाकूर ...

December 22, 2024 8:26 PM December 22, 2024 8:26 PM

views 27

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २११ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला २११ धावांनी पराभूत करत या मालिकेत दणदणीत विजयी सलामी दिली.    वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.     विजयासाठी ३१५ धाव...

December 12, 2024 8:35 AM December 12, 2024 8:35 AM

views 34

महिलांच्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल पर्थ इथे झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 83 धावांनी पराभव करत ही संपूर्ण मालिका जिंकली. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 45 षटक आणि एका चेंडूत 215 धावांतच आटोपला. भारताकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक 105 धावा केल्या. अरुंधती रेड्डीनं 4 बळी घेतले. तत्पूर्वी, ॲनाबेल सदरलँडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेलनं 95 चेंडूत 110 धावा केल्या.