November 14, 2024 2:59 PM November 14, 2024 2:59 PM

views 3

हॉकी : महिला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सामना थायलंड संघाशी होणार

बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज यजमान भारताचा सामना थायलंडच्या संघाशी होणार आहे. राजगीर इथे संध्याकाळी पावणे पाच वाजता हा सामना सुरू होईल. यापूर्वीच्या दोन सामन्यां भारताच्या संघाने मलेशिया आणि दक्षिण कोरियाचा पराभव केला होता. या स्पर्धेत आज दुपारी अडीच वाजता जपानचा सामना चीनसोबत होणार आहे.