June 27, 2025 1:42 PM June 27, 2025 1:42 PM

views 5

दुसऱ्या आशियायी स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं तिन्ही गटातलं पटकावलं विजेतेपद

दुसऱ्या आशियायी स्क्वॉश दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं काल तिन्ही गटातलं विजेतेपद पटकावलं. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित अभय सिंग आणि वेल्वन लेंतिलकुमार यांनी पाकिस्तानच्या नूर जमान आणि नसीर इक्बाल यांच्यावर २- १ अशी मात केली. महिला दुहेरीचं अजिंक्यपद द्वितीय मानांकित जोशना चिनप्पा आणि अनाहत सिंग या भारतीय जोडीनं पटकावलं. तर अव्वल मानांकित अभय आणि अनाहत या जोडीनं मिश्र दुहेरीत २-० नं विजय मिळवला.

November 12, 2024 8:28 AM November 12, 2024 8:28 AM

views 3

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं बिहारमध्ये उद्घाटन, भारताची विजयी सलामी

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं उद्घाटन काल बिहारमध्ये राजगीर इथं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते झालं. कालच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं मलेशियावर 4-0 असा विजय मिळवला. दरम्यान, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली. अन्य एका सामन्यात चीननं थायलंडच्या संघावर 15-0 असा दणदणीत विजय मिळवला.