December 11, 2024 7:30 PM December 11, 2024 7:30 PM
5
महिला क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ८३ धावांनी विजय
महिला क्रिकेटमध्ये, आज पर्थ इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ८३ धावांनी विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. एनाबेला सिदरलँडच्या ११० धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला ही मजल गाठता आली. भारतातर्फे रेड्डीनं चार, तर दीप्ती शर्मानं एक बळी मिळवला. विजयासाठी २९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सलामीच्या जोडीतली रिचा घोष ५ व्या षटकातच २...