January 21, 2025 1:40 PM January 21, 2025 1:40 PM

views 9

९ वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-मलेशिया आमनेसामने

मलेशिया इथ सुरू असलेल्या २० षटकांच्या १९ वर्षाखालील महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज अ  गटात भारतीय संघाचा सामना यजमान मलेशिया संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार क्वाललांपूर  इथ आज दुपारी हा सामना खेळला जाणार आहे. दुसरा सामना श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होईल. दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा अवघ्या ४ षटकात  केवळ ४४ धावांच्या बदल्यात  ९ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सध्या अ  गटात २ गुण मिळवून  सर्वात वरच्या स्थानावर आहे.     

January 15, 2025 8:49 PM January 15, 2025 8:49 PM

views 7

आयर्लंडला पराभूत करत भारताचा ३-० असा मालिका विजय

महिला क्रिकेटमधे राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडला ३०४ धावांनी पराभूत करत या मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ५ गड्यांच्या मोेबदल्यात ४३५ धावा केल्या. सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या दोघींनी शतकं ठोकली. प्रतिकानं १५४, तर मंधानानं ८० चेंडूत १३५ धावा केल्या. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी २३३ धावांची भागिदारी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. अवघ्या ७० चेंडूत स्मृतीनं आज आपलं शतक पूर्ण केलं. द...

January 12, 2025 8:13 PM January 12, 2025 8:13 PM

views 5

महिला क्रिकेटमधे भारताचा आयर्लंडवर ११६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध राजकोट इथं आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडवर ११६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी भारतानं निर्धारित ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ३७० धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं तडाखेबंद शतकी खेळी केली. तिनं ९१ चेंडूत १०२ धावा केल्या. हर्निल देओल ८९, स्मृती मंधना ७३, तर प्रतिका रावलनं ६७ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडला ७ गडी गमावून २५४ धावांपर्यंतच मजल मारता आली. आयर्लंड क्रिस्टीना कोल्टर रॅलीनं ८० धावा केल्या भारतातर्फे दिप्ती शर्...

January 6, 2025 4:02 PM January 6, 2025 4:02 PM

views 14

महिला क्रिकेटमधे आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. स्मृती मंधानाची कर्णधार आणि दीप्ती शर्माची उपकर्णधार म्हणून तर यष्टीरक्षक म्हणून ऋचा घोष आणि उमा छेत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   या संघात प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, राघवी बिस्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कानवर, तितास साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे यांचा समावेश आहे. मालिकेला १० जानेवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सा...

December 22, 2024 7:16 PM December 22, 2024 7:16 PM

views 11

पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचं वेस्टइंडिजला ३१५ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजपुढे ३१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.  

December 20, 2024 11:14 AM December 20, 2024 11:14 AM

views 10

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेस्टइंडिजवर विजय

महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्टइंडिजचा तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी टी-ट्वेंटीमधील आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधनानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. रिचानं केवळ 18 चेंडूत पन्नास धावा काढून विक्रम केला, ती सामनावीर ठरली. उत्तरादाखल वेस्टइंडीज संघ 20 षटकात 9 बाद 157 धावाच करु शकला. स्मृती मंधनाला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. उभय संघांमध्ये पन्नास षटकांची मालिका परवा 22 त...

December 19, 2024 10:01 AM December 19, 2024 10:01 AM

views 35

महिला क्रिकेट : भारत-वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा सामना नवी मुंबईत होणार

भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा तिसरा सामना आज नवी मुंबईत खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकून बरोबरी केली आहे.

December 18, 2024 11:10 AM December 18, 2024 11:10 AM

views 9

महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडिजचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या २० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघाची १-१ अशी बरोबर झाली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हैले मॅथ्यूजनं ८५ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारतानं वेस्टइंडिजसमोर १६० धावाचं लक्ष्य ठेवलं होतं.

December 17, 2024 8:54 PM December 17, 2024 8:54 PM

views 5

महिला क्रिकेट टी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा क्षेत्र रक्षणाचा निर्णय

महिला क्रिकेटमधे, आज नवी मुंबईत डी वाय पाटील स्टे़डिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं.    शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १६ षटकात ५ बाद ११० धावा झाल्या होत्या. कर्णधार स्मृती मंधनानं तडाखेबंद अर्धशतक करताना ४१ चेंडूत ६२ धावा केल्या.    तीन सामन्यांच्या या मालिकेत, रविवारी याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४९ धावांनी विजय मिळवला होता.  तिसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. ...

December 17, 2024 10:07 AM December 17, 2024 10:07 AM

views 12

नवी मुंबईत भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान महिला क्रिकेट संघांदरम्यान आज दुसरा सामना

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्टइंडीज संघांदरम्यान २० षटकांचा दुसरा सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्टइंडीजवर ४९ धावांनी मात केली. वेस्टइंडीजचा महिला क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघ २० आणि ५० षटकांचे प्रत्येकी तीन सामने खेळणार आहेत.