November 2, 2025 2:37 PM November 2, 2025 2:37 PM

views 2.2K

Womens ODI Cricket: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगेल.  नवी मुंबईतल्या  डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.    गुरुवारी नवी मुंबई मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर गुवाहाटी इथं  झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत  दक्षिण आफ्रिकेनं  इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम फेरीत खेळत आ...

October 26, 2025 8:18 PM October 26, 2025 8:18 PM

views 144

Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आहे. बांगला देशाच्या तेराव्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला.    या स्पर्धेत गुणतालिकेत भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे.

October 21, 2025 12:47 PM October 21, 2025 12:47 PM

views 77

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, नवी मुंबईच्या डॉक्टर डीवाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर काल झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा 7 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं हसिनी परेराच्या 85 धावांच्या जोरावर सर्व बाद 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 50 षटकांत 9 बाद 195 धावांवर संपुष्टात आला. शेवटच्या षटकात विजयासाठी9 धावांची आवश्यकता असताना बांगलादेशनं पहिल्या चार चेंडूंत चार खेळाडू गमावले. या निकालामुळं श्रीलंकेच्या उ...