May 1, 2025 7:04 PM

views 12

राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या १०० दिवसांचं मूल्यमापन जाहीर

राज्यात शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन आज जाहीर झालं. कार्यक्षम संकेतस्थळ, कार्यालयीन तसंच तक्रार निवारण सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अशा दहा मुद्द्यांवर  भारतीय गुणवत्ता परिषदेनं केलेल्या या मूल्यमापनानुसार ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त केलं आहे.    या शंभर दिवसांच्या मूल्यमापनात महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला आहे तर त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि परिवहन आणि बंदरे विभाग हे मंत्रालय...

February 13, 2025 4:01 PM

views 12

महिला आणि बालविकास विभागात १८,८८२ पदांची भरती

महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ आणि अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसचं भिवंडी शहरात अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आ...