November 7, 2025 8:56 PM November 7, 2025 8:56 PM

views 97

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केलं. तर या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सर्व महिला क्रिकेट संघाचा सहाय्यक कर्मचारी वर्गालाही ११...

July 12, 2025 7:50 PM July 12, 2025 7:50 PM

views 1

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिलांचा अंतिम सामना इगा श्वियांतेक आणि अमांडा अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा श्वियांतेक हिच्यासमोर अमांडा अनिसिमोव्हा हिचं आव्हान असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठला सुरु होईल.   तर उद्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर आणि गतविजेता कार्लोस अल्काराज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.