December 2, 2024 8:02 PM December 2, 2024 8:02 PM

views 10

भामरागड दलमची सदस्य असलेल्या नक्षल महिलेचं पोलीस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात आज भामरागड दलमची सदस्य असलेल्या एका  नक्षल महिलेनं पोलिस आणि केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केलं. ८ चकमकी, ३ खून आणि एका दरोड्याच्या गुन्ह्यात तिचा सहभाग होता. राज्य शासनानं  तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.   गडचिरोली जिल्ह्यात आजपासून सुरु झालेल्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहात पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. 

November 10, 2024 3:43 PM November 10, 2024 3:43 PM

views 7

नक्षलवादी महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

छत्तीसगड इथल्या बिजापूर जिल्ह्याची रहिवासी असलेल्या लक्ष्मी बंडे मज्जी या नक्षलवादी महिलेने काल गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. लक्ष्मी मज्जी ही २०१७ मध्ये भामरागड दलम आणि इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचची सदस्य म्हणून दाखल झाली. राज्य शासनानं तिच्यावर २ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.