December 17, 2025 7:59 PM December 17, 2025 7:59 PM
5
अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक लोकसभेत मंजूर
अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या क्षेत्रात सुरक्षा, दर्जा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या यंत्रणा बळकट करण्याचं काम हे विधेयक करेल, असा विश्वास अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. या क्षेत्रातल्या खासगी कंपन्यांना सरकार जास्त अधिकार आणि स्वातंत्र्य देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कायद्यामुळे २०४७पर्यंत १०० गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य होईल, असंही ते म्हणाले. अणुऊर्जेसारख्या क...