December 16, 2025 8:52 PM December 16, 2025 8:52 PM
2
राज्यसभेत निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेचा समारोप
राज्यसभेनं आज पुरवणी मागण्यांवर चर्चा पूर्ण केली, तसंच निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेचाही सभागृहात समारोप झाला. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, आणि कोणत्याही अपात्र मतदाराचा समावेश याद्यांमध्ये असू नये, असं भारताची राज्यघटना सांगते, असं प्रतिपादन सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी या चर्चेदरम्यान केलं. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया राबवणं हे निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येतं, याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि निवडणूक आयोगाच्या कामाचं कौतुक केलं. मतदारयाद्यांच्य...