December 15, 2024 1:40 PM December 15, 2024 1:40 PM
3
उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आजही मध्य प्रदेशातील काही भागात जोरदार थंडीची लाट कायम राहू शकते असंही सांगितलं. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या काही भागांमध्ये पुढील २ दिवस थंडीचा वाढता प्रभाव राहील असं हवामान विभागानं सांगितलं आहे. तसच जम्मू काश्मीर, लददाख, गिलगीट बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद मध्ये देखील थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.