December 16, 2024 7:34 PM

views 12

ESIC आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्यातून वैद्यकीय सेवा पुरवणार

गेल्या १० वर्षांत देशभरात ९७ नव्या इएसआय रूग्णालयांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली. देशातल्या १६५ इएसआय रूग्णालयांमध्ये तसंच ५९० दवाखान्यांमध्ये विमा सुरक्षेखाली येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात इएसआयसी  समावेशक वैद्यकीय सेवा देत आहे.  आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्यातून इएसआयसी वैद्यकीय सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

December 13, 2024 2:46 PM

views 5

राज्यसभेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांनी हा अविश्वास ठराव आणला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आजही खडाजंगी झाली. गेल्या तीस वर्षात आणि आपल्या कार्यकाळात राज्यसभेच्या अध्यक्षांच्याविरोधात अशा किती नोटीस आल्या आहेत ते सभागृहासमोर यावं असं धनखड म्हणाले. विरोधी सदस्यांच्या वर्तनावर आणि त्यानी सभागृहाबाहेर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधकांना त्यांच्याविरोधात ...

November 29, 2024 1:07 PM

views 16

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले. त्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज चौथ्या दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी लाच प्रकरणाबाबत गदारोळ सुरु केला. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळं राज्यसभेचं कामकाज अपेक्षेप्रमाणे होत नसल्यानं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेचं कामक...

November 28, 2024 8:16 AM

views 9

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी...

November 25, 2024 6:36 PM

views 24

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल, अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतानं संविधान स्वीकारून ७५ वर्षे झाली आहेत हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल, असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. मतदारांनी सत्ता द्यायला नकार दिलेले मूठभर लोक संसदेत विनाकारण गोंधळ करतात, असं ते म्हणाले.   संसदेतल्या वेळेचा उपयोग देशाची प्रतिष्ठा जगात वाढवण्यासाठीच  करायला हव...

November 24, 2024 7:59 PM

views 18

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू

संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. ३० विविध राजकीय पक्षांचे ४२ नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्व सूच...

November 23, 2024 8:44 PM

views 19

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी ते सर्वपक्षीय सदस्यांना सहकार्याचं आवाहन करतील. संसदेचं अधिवेशन  येत्या सोमवारी सुरु होत असून ते २० डिसेंबरपर्यंत चालेल. येत्या २६ नोव्हेंबरला संविधानदिनानिमित्त सभागृहाची बैठक होणार नाही. 

November 5, 2024 6:32 PM

views 15

संसदेचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून होणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी आज समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून दिली. २६ नोव्हेंबरला भारतीय संविधानाचा स्वीकार करण्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून त्याचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला जाणार असल्याचंही रिजीजू यांनी सांगितलं.