November 30, 2025 6:55 PM

views 31

संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल आणि डॉ. एल मुरुगन बैठकीला उपस्थित होते. कांग्रेसचे गौरव गोगोई, शिवसेनेचे नरेश म्हस्के, द्रमुकचे तिरुचि शिवा, तृणमूलचे डेरेक ओब्रायन, इत्यादी नेते बैठकीत सहभागी झाले होते. बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याचं संसदीय कार्य मंत्री ...

November 30, 2025 10:47 AM

views 19

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून  सुरू होत असून  त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज  सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे .यावेळी संसदीय कामकाज  मंत्री किरेन रीजिजू लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना विनंती करेल, असं रिजीजू यांनी सांगितलं. हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.या काळात विविध महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची आणि  ती  मंजूर होण्याची शक्यता  असून त्यामध्ये अणु विधेयक 2025 , विमा...

December 19, 2024 8:17 PM

views 10

भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश

भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश असून ४० देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. नेपाळ, भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. पर्यटन, वैद्यकीय आणि व्यावसायिक कारणांसाठी भारताला भेट देणाऱ्या मालदीवच्या नागरिकांना पूर्वीच्या व्हिसाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे.

December 19, 2024 8:09 PM

views 12

संसदभवन परिसरात झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपा आणि काँग्रेसचे परस्परांविरोधात गुन्हे दाखल

संसद भवन परिसरात निदर्शनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपा आणि काँग्रेसने परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. भाजपानं निदर्शनादरम्यान पक्षाचे दोन खासदार जखमी झाल्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपाचे नेते अनुराग सिंह ठाकूर हे बातमीदारांशी बोलत होते. तसंच काँग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने भाजपाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संसदेच्या मकर द्वारपर्यंत काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा दरम्यान मकर द्वार इथं जमलेल्या भाजप नेत...

December 19, 2024 8:27 PM

views 5

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळला

राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळला आहे.  अध्यक्ष धनखड पक्षपात करत असल्याचा आरोप करुन विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडला होता. तो घाईघाईने, कसातरी आणि केवळ अध्यक्षांचं प्रतिमाहनन करण्यासाठी मांडला गेल्याची प्रतिक्रीया हरिवंश यांनी फेटाळताना दिली. या प्रस्तावामुळे संवैधानिक संस्थांचंही हनन होत असल्याचं ते म्हणाले. १० डिसेंबर रोजी किमान ६० सदस्यांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव मांडण्याची नोटीस देण्यात आली होती.

December 19, 2024 7:28 PM

views 12

बांगलादेशात होत असलेल्या हल्ल्याच्या वृत्तांची केंद्रसरकारकडून गंभीर दखल

बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याच्या वृत्तांची गंभीर दखल घेतली असल्याचं केंद्रसरकारने आज राज्यसभेत सांगितलं. परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी एका लेखी उत्तरात सांगितलं की बांगला देशात हिंदू मंदिरं, आणि हिंदूंची घरं, दुकानं इत्यादींवर हिंसक हल्ले होत असल्याची गंभीर दखल घेऊन सरकारने त्याबाबात बांग्ला देशच्या सरकारकडे चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात ८८ गुन्हे दाखल झाले असून सुमारे ७० जणांना बांगलादेश पोलिसांनी अटक केली आहे. तिथल्या नागरिकांच्या सुरक्...

December 19, 2024 7:18 PM

views 12

हवामानाचा अंदाज अचूक देण्यासाठी पुण्यातल्या IITM इथं विशेष आभासी केंद्राची स्थापना

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर हवामान तसंच सागरी हवामान बदल अशा क्षेत्रांमध्ये करण्यात येत असल्याची माहिती भूविज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. हवामान शास्त्राच्या अंदाजांमध्ये अचूकता आणणं तसंच त्याची कार्यक्षमता वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून विविध उप्रकम राबवले जात आहेत. यात कृषी, आपत्ती व्यवस्थापन, शहरी नियोजन अशा क्षेत्रांचा समावेश आहे. हवामानाचा अंदाज आणखी अचूक देता यावा यासाठी पुण्यातल्या आ...

December 18, 2024 7:34 PM

views 7

सात केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यास सरकारची मंजुरी

राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा विकास उपक्रमांतर्गत पुण्यासह आणखी  ६ ठिकाणी    केंद्रीय  न्यायवैद्यक विज्ञान  प्रयोगशाळा उभारण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री बंदी संजय कुमार यांनी आज राज्यसभेत एका  प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.   राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांमध्ये डीएनए विश्लेषण आणि सायबर  न्यायवैद्यक क्षमता मजबूत करण्यासाठी, सरकारनं आतापर्यंत २४५ कोटी २९ लाख  रुपयांपैकी १८५कोटी २८लाख रुपये जारी केले आहेत. भोपाळ, चंदीगड, आसाममधील कामरूप, हैदरा...

December 17, 2024 6:18 PM

views 14

लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर

लोकसभेत आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे. गेले ३ वर्ष देशाचा वृद्धीदर सरासरी ८ पूर्णांक ३ दशांश टक्के होता, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारनं ११ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च पायाभूत सुविधांवर करायचा ठरवला आहे. त्यामुळं येत्या काही वर्षात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असं त्या म्हणाल्या. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाह...

December 16, 2024 7:33 PM

views 5

केंद्र सरकारनं ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या

केंद्र सरकारनं आज ८७ हजार ७६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या लोकसभेत मांडल्या. त्यातल्या ४४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या मागण्या कर्जाचा परतावा, व्याज वगैरेसाठी आहे.    चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी गेल्या काही वर्षात माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, रिटेल, ग्राहकोपयोगी वस्तू आणि बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षात वेतनवाढ झाली नसल्याचा दावा केला.    भाजपाचे खासदार डॉ. संजय जयस्वाल यांनी पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं २५ हजार कोटी रुपये ...