December 18, 2025 8:06 PM December 18, 2025 8:06 PM
13
अणुऊर्जा विषयक विधेयक संसदेत मंजूर
‘अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक आज राज्यसभेत संमत झालं. लोकसभेत काल हे विधेयक मंजूर झालं होतं. अणु ऊर्जेचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण, तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं, हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. अणु उर्जा प्रकल्पाशी संबंधित अपघात झाल्यास सरकारचं उत्तरदायित्व निश्चित करण्यात आलंय आणि त्याकरता विशेष अणुऊर्जा उत्तर दायित्व निधीची तरतूद आहे.