October 23, 2025 2:49 PM October 23, 2025 2:49 PM

views 159

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा मशालवाहक म्हणून निवडण्यात आलं आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी ६ ते २२ फेब्रुवारी या दरम्यान इटलीत मिलान आणि कोर्टिना डी अमपेत्झो इथे होणार आहे. या स्पर्धेसाठी मशालवाहक म्हणून आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची भावना बिंद्रा यांनी आपल्या समाज माध्यमावर व्यक्त केली आहे.