December 14, 2025 5:19 PM December 14, 2025 5:19 PM

views 7

जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची टीका

या अधिवेशनात जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नागपूरमधे वार्ताहर परिषदेत केली. कुपोषण, भ्रष्टाचार, अमली पदार्थाची विक्री याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला सरकारने उत्तर दिलं नाही, फक्त महानगरपालिका निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून पुरवणी मागण्या मंजूर  करून घेणं हाच अधिवेशनाचा हेतू होता, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यातून विदर्भाच्या वाट्याला काहीही आलं नसून घाई...

December 21, 2024 2:58 PM December 21, 2024 2:58 PM

views 11

विधिमंडळ अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात ४२ मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते. विदर्भात गेल्या अकरा महिन्यात २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, गेल्या तीन वर्षांत सात हजार आत्महत्या झाल्या. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही, सत्ताधारी सदस्य...

December 18, 2024 7:34 PM December 18, 2024 7:34 PM

views 9

वस्तू आणि सेवा कायद्यात दुरुस्ती, मुद्रांक शुल्कात वाढ प्रस्तावित करणारं विधेयक मंजूर

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या ३ आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. ३१ मार्च २०२५ ही कराच्या रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरचं सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केलं. राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या करदात्यांकडून साधारण एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत. विव...

December 18, 2024 7:04 PM December 18, 2024 7:04 PM

views 7

परभणी आणि बीडमधल्या हिंसाचार प्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू

परभणीतल्या पुतळा विटंबना, हिंसाचार, आंदोलन आणि बीड जिल्ह्यातल्या हत्येबाबत विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर आज विधानसभेत चर्चा सुरु झाली. काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी चर्चेला सुरुवात केली. परभणीतल्या घटनेनंतर पोलिसांनी दलित वस्तीत घुसून अमानुष मारहाण केली. हे गंभीर आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी केला.    शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले, त्याच्या धक्क्यानं विजयकुमार वाकोडे यांचं निधन झालं. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्...

December 18, 2024 6:59 PM December 18, 2024 6:59 PM

views 10

शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, शहरी नक्षल अड्डे बंद करण्यासाठी 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक-2024' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले. संविधानावरचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत. अटकेतल्या नक्षलवाद्यांना सोडवण्यासाठी त्या शहरी भागात काम करतात. या संस्थांना आळा घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्रप्रदेशातही अशाप्रकारचा कायदा आहे. राज्यातल्या नक्षल विरोधी पथकानं अशाप्रकारच्या कायद्याची मागणी केली होती. त्यामुळंच...

December 18, 2024 3:42 PM December 18, 2024 3:42 PM

views 6

विरोधकांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन

विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन केलं. वाईट परिस्थितीमुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही, धानाला बोनस नाही. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

December 17, 2024 8:34 PM December 17, 2024 8:34 PM

views 7

विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" योजनेंतर्गत महिलांना देण्यात आलेली रक्कम अत्यंत कमी असून त्यात किती रुपयांची वाढ केली जाणार,  आसा प्रश्न विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेत बोलत होते.    राज्यात "जल जीवन मिशन योजना" राबवताना अनेक ठिकाणी गैरव्यवहार आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक कामं संथगतीने सुरु असून अपूर्णावस्थेत आहेत. त्यावर कोणती कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. गेल्या काही वर्ष...

December 17, 2024 7:30 PM December 17, 2024 7:30 PM

views 8

विधानसभेत विरोधकांनी परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला

विधानसभेत विरोधकांनी आज कामकाज सुरू झाल्यावर परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. त्याला कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. याप्रकरणी उद्या चर्चा घेण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यावर नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग करुन दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. कामकाज सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर विरोधकांन...