July 11, 2025 1:33 PM July 11, 2025 1:33 PM

views 10

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज जोकोविच, यानिक सिनर, अल्काराज यांचे सामने

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात आज नोव्हाक जोकोविच याच्यासमोर अग्रमानांकित यानिक सिनर याचं आव्हान असेल, तर दुसऱ्या सामन्यात कार्लोस अल्काराज आणि टेलर फ्रिट्झ आज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.   महिला एकेरीत काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमांडा अनिसिमोव्हा हिनं अग्रमानांकित अरीना साबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या सामन्यात अमांडा हिनं अरीना हिच्यावर ६-४, ४-६, ६-४ अशी मात केली. अजिंक्यपदासाठी आता तिच्यासमोर इगा श्वियांतेक हिचं आव्हान असेल. इगा हिनं बेलिंडा बेंचिच ह...

July 6, 2025 1:23 PM July 6, 2025 1:23 PM

views 9

विम्बल्डनमध्ये अरीना साबालेंका आणि कार्लोस अल्काराज यांचे सामने

विम्बल्डनमध्ये आज महिला एकेरीत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिचा सामना एलीजे मर्टन्स हिच्याविरुद्ध रंगणार आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला, गतविजेता कार्लोस अल्काराज याच्यासमोर आंद्रे रुब्लेव्ह याचं आव्हान असेल. तर पाचव्या क्रमांकावर असलेला टेलर फ्रिट्झ, जॉर्डन थॉम्पसन याच्याविरुद्ध मैदानात उतरेल. दरम्यान, या स्पर्धेत महिला एकेरीत काल क्लारा टॉसन हिनं अकराव्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकीना हिला थेट सेट्समध्ये हरवलं. तर पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनर यानं पेद्...

July 2, 2025 2:20 PM July 2, 2025 2:20 PM

views 4

विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जेनिक सिनर याने इटलीच्या लुका नार्डीचा केला पराभव

टेनिस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरच्या जेनिक सिनर याने विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या लुका नार्डी याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आतापर्यंत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविचने फ्रेंच खेळाडू अलेक्झांड्रे मुलर विरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ४ सेटमध्ये विजय मिळवून आठव्या विम्बल्डन विजेतेपदासाठी पाऊल पुढं टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती ठरलेली कोको गॉफ हिला विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. य...

July 1, 2025 2:43 PM July 1, 2025 2:43 PM

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत गतविजेत्या स्पेनच्या कार्लोस अल्कराझनं इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीचा ३-२ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  उद्या त्याचा सामना ब्रिटनच्या ऑलिव्हर टार्वेट बरोबर होणार आहे.   महिला एकेरीच्या लढतीची सुरुवात आज  अमेरिकेच्या कोको गौफ्फ आणि युक्रेनच्या डायना यास्ट्रेमस्का यांच्यातल्या सामान्यानं होणार आहे. दरम्यान रोहन बोपण्णा, युकी भांबरी, श्रीराम बालाजी आणि रित्विक चौधरी बोल्लीपल्ली हे भारताचे शिलेदार उद्या आपापले सामने खेळणार आहेत.

July 3, 2024 2:40 PM July 3, 2024 2:40 PM

views 20

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : भारताचे रोहन बोपण्णा, सुमित नागल पुरुष दुहेरीचे सामने खेळणार

लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांचा सामना आज संध्याकाळी जिओव्हानी मपेत्शी पेरिकार्ड आणि ॲड्रिन मॅनरिनो यांच्याशी होणार आहे. तसंच, भारताच्या सुमित नागल आणि सर्बियाचा दुसान लाजोविच यांची लढत देखील आज संध्याकाळी पेद्रो मार्टिनेझ आणि जॉमे मुनार या स्पॅनिश जोडीशी होणार आहे.    विम्बल्डन स्पर्धेतल्या याआधीच्या सामन्यात पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविचने चेक प्रजासत्ताकच्या विट कोप्रिव्ह...