July 12, 2025 7:50 PM July 12, 2025 7:50 PM

views 1

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिलांचा अंतिम सामना इगा श्वियांतेक आणि अमांडा अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा श्वियांतेक हिच्यासमोर अमांडा अनिसिमोव्हा हिचं आव्हान असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठला सुरु होईल.   तर उद्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर आणि गतविजेता कार्लोस अल्काराज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.

July 6, 2025 1:23 PM July 6, 2025 1:23 PM

views 6

विम्बल्डनमध्ये अरीना साबालेंका आणि कार्लोस अल्काराज यांचे सामने

विम्बल्डनमध्ये आज महिला एकेरीत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिचा सामना एलीजे मर्टन्स हिच्याविरुद्ध रंगणार आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला, गतविजेता कार्लोस अल्काराज याच्यासमोर आंद्रे रुब्लेव्ह याचं आव्हान असेल. तर पाचव्या क्रमांकावर असलेला टेलर फ्रिट्झ, जॉर्डन थॉम्पसन याच्याविरुद्ध मैदानात उतरेल. दरम्यान, या स्पर्धेत महिला एकेरीत काल क्लारा टॉसन हिनं अकराव्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकीना हिला थेट सेट्समध्ये हरवलं. तर पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनर यानं पेद्...

July 5, 2025 4:07 PM July 5, 2025 4:07 PM

views 25

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. पुरुष दुहेरीत आज युकी भांब्री आणि अमेरिकेचा रॉबर्ट गैलोवे यांच्या जोडीचा सामना पोर्तुगालच्या नूनो बोर्गेस आणि अमेरिकेच्या मार्कोस गिरोन या जोडीशी होणार आहे. तर भारताच्या एन.श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोच्या मिगुएल एंजल रेयेस-वरेला या जोडीचा सामना अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस आणि स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सशी होईल. भारताचा रित्विक चौधरी बोलिपल्ली आणि कोलंबियाचा निकोलस बॅरिएंटोस ही जोडी ब्रिटनच्या जो सॅलिसबरी आणि नील स्कुप्सकी यांच्य...

July 2, 2025 2:20 PM July 2, 2025 2:20 PM

views 1

विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जेनिक सिनर याने इटलीच्या लुका नार्डीचा केला पराभव

टेनिस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरच्या जेनिक सिनर याने विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या लुका नार्डी याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आतापर्यंत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविचने फ्रेंच खेळाडू अलेक्झांड्रे मुलर विरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ४ सेटमध्ये विजय मिळवून आठव्या विम्बल्डन विजेतेपदासाठी पाऊल पुढं टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती ठरलेली कोको गॉफ हिला विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. य...

July 12, 2024 2:53 PM July 12, 2024 2:53 PM

views 38

विम्बल्डन टेनिस : पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत  गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. दुसरीकडे, रशियाचा पाचवा मानांकित मेदवेदेव यानं इटलीच्या अव्वल मानांकित यानिक जिनरवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात सात वेळा विजेता असणारा सर्बियाचा द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचचा सामना इटलीच्या लोरेंजो मुसेटीबरोबर होईल.  दरम्यान, महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्य फेरीत बारबोरा क्रेचिकोवानं कजाकिस्तानच्या एलेना रबाकिना...

July 10, 2024 11:43 AM July 10, 2024 11:43 AM

views 10

विम्बलडन टेनिस स्पर्धा : रशियाच्या डॅनिएल मेदवेदेव उपांत्य फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विम्बलडन टेनिस स्पर्धेत डॅनिएल मेदवेदेव यानं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जानिक सिन्नेर याचा 6-7, 6-4, 7-6, 2-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या मोदवेदेवनं स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येत्या शुक्रवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अल्कराज बरोबर त्याचा सामना होणार आहे. महिला एकेरीत क्रोएशियाच्या डोना वेकीक हिनं न्युझिलंडच्या लुलू सन हिचा 5-7, 6-4, 6-1 असा पराभव केला. तिचा उपांत्य ...

July 8, 2024 1:10 PM July 8, 2024 1:10 PM

views 11

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : कार्लोस अल्काराज आणि जेनिक सिनर यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत गतविजेता कार्लोस अल्काराज आणि अव्वल मानांकित जेनिक सिनर यांनी काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.     अल्काराझने  फ्रान्सच्या उगो हम्बर्ट याचा ६-३, ६-४, १-६, ७-५ असा पराभव केला. तर सिनरने अमेरिकन खेळाडू बेन शेल्टन याला ६-२,६-४,७-६(९) असं नमवलं.    सात वेळा विजेतेपद पटकावणारा नोवाक जोकोविच याचा सामना डेनिश खेळाडू वोल्गर रुन याच्याशी आज रात्री होणार आहे. जर्मन खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव याचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रित्झ याच्याशी होईल.  तर महिला एकेरित गतविजेती ए...