January 9, 2025 7:29 PM January 9, 2025 7:29 PM

views 6

‘सकारात्मक उपाययोजनांमधून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल’

सकारात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते आज चंद्रपूरमध्ये ‘वाईल्डकॉन – २०२५’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना या विषयावर आयोजित करण्यात आलेली ही  देशातली पहिलीच परिषद होती.  वनक्षेत्रात विकास कामं होत असल्यामुळे प्राण्यांच्या अधिवासाची जागा कमी झाली आहे. त्यामुळेच मानव-वन्यज...