August 8, 2024 7:29 PM August 8, 2024 7:29 PM

views 8

राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांची येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदची हाक

अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानं बाजार समितीनं आकारलेला नियमन कर रद्द करावा या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांनी येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदचा इशारा दिला आहे. या बंदमध्ये देशभरातल्या बाजार समितींचाही सहभाग असावा यासाठी उद्या दिल्ली इथं व्यापाऱ्यांची बैठक होणार असून त्यात या बंदबाबत निर्णय होणार आहे, अशी माहिती द ग्रेन राईस अँड ऑईल सीड मर्चंट असोसिएशनच्या अधिकृत सूत्रांनी आकाशवाणी वार्ताहराला दिली आहे.