December 19, 2025 8:17 PM December 19, 2025 8:17 PM
5
पारंपरिक औषधशास्त्राचं महत्त्व वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं-प्रधानमंत्री
पारंपरिक औषधशास्त्राला योग्य ते महत्त्व दिलं जात नसून ते वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. पारंपरिक औषधांवरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. पारंपरिक औषधशास्त्राला चालना देण्यासाठी संशोधन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमन आराखडा तयार करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात माय आयुष एकात्मिक सेवा पोर्टल, आयुष उत्पादनं आणि सेवांसाठीचं मानक असलेल...