January 23, 2026 1:28 PM
16
जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका औपचारिकरीत्या बाहेर
जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा अमेरिकने केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि आरोग्यमंत्री रॉबर्ट केनेडी यांनी संयुक्त निवेदन जारी करुन हा निर्णय जाहीर केला. अकार्यक्षम नोकरशाही आणि कोविड १९ महामारीदरम्यानचं ढिसाळ व्यवस्थापन यामुळे संघटनेचा मूळ उद्देश मागे पडल्याची टीका निवेदनात केली आहे. अनेक अमेरिकन नागरिकांचे प्राण वाचले असते अशी महत्त्वाची माहिती ‘हू’ने वेळच्या वेळी दिली नाही असा आरोप अमेरिकेने केला आहे. या निर्णयाबरोबर अमेरिकेकडून ‘हू’ला मिळणारं अर्थसहाय्य पूर...