May 3, 2025 12:52 PM May 3, 2025 12:52 PM
16
अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार
पुढील महिन्यात १४ जून रोजी अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार आहे. काल व्हाईट हाऊस प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. वॉशिंग्टन इथल्या नॅशनल मॉलमध्ये आय़ोजित एक दिवसाच्या कार्यक्रमात ६ हजार ६०० सैनिक, १५० लष्करी वाहनं आणि ५० विमानांचा सहभाग असणार आहे. पहिल्या महायुद्धाचा विजय दिन, असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं आहे. याच दिवशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस देखील आहे.