May 1, 2025 7:46 PM May 1, 2025 7:46 PM

views 24

देशात यावर्षी २५६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी

देशात यावर्षी २५६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी पूर्ण झाली असल्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक पुरवठा सचिव संजीव चोप्रा यानी दिली आहे. दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, या वर्षीच्या अखेरपर्यंत ३१२ मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीमुळे शेतकऱ्यांच्या गव्हाची खरेदी, वजन आणि किंमत अदा करणे ही प्रक्रिया ४८ तासात पूर्ण होते.

December 12, 2024 1:46 PM December 12, 2024 1:46 PM

views 24

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा आता दोन हजार टनांवरून एक हजार टनांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रति विक्री कक्षासाठीची मर्यादा दहा टनांवरून पाच टनांपर्यंत आणण्यात आली आहे. अन्नसुरक्षेचं नियोजन करण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधले व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते ...

June 20, 2024 8:34 PM June 20, 2024 8:34 PM

views 5

देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारचं निवेदन

देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही आज सरकारनं दिली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. रब्बी हंगामात १८ जून २०२४ पर्यंत २६६ लाख मेट्रिक टन तर २०२३मध्ये २६२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गव्हाच्या दरावर बारकाईनं लक्ष्य देऊन देशातल्या ग्राहकांसाठी स्थिर दराची ग्वाही मिळावी यासाठी योग्य तो ध...