May 1, 2025 7:46 PM May 1, 2025 7:46 PM

views 23

देशात यावर्षी २५६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी

देशात यावर्षी २५६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी पूर्ण झाली असल्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक पुरवठा सचिव संजीव चोप्रा यानी दिली आहे. दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, या वर्षीच्या अखेरपर्यंत ३१२ मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीमुळे शेतकऱ्यांच्या गव्हाची खरेदी, वजन आणि किंमत अदा करणे ही प्रक्रिया ४८ तासात पूर्ण होते.

October 19, 2024 7:47 PM October 19, 2024 7:47 PM

views 2

गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरू

भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था कर्नाल यांनी आज केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या गव्हाच्या १३ नवीन वाणांच्या बियाणांचं वितरण सुरु केलं आहे. नवीन वाणांचं बियाणं घेण्यासाठी देशभरातल्या २२ हजार शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली होती. गव्हाचं नवीन वाण अधिक उत्पादन देण्याबरोबरच रोग प्रतिबंधक आहे. बार्ली वाण DWRV 137 चा देखील गव्हाच्या मान्यताप्राप्त वाणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यातल्या पेंढ्यामध्येही उपयोग करता येईल. गेल्या वर्षी ११३ पूर्णांक २९ दशलक्ष टन विक्रमी उत्प...