February 2, 2025 3:38 PM February 2, 2025 3:38 PM
12
आज जागतिक पाणथळ जागा दिन
आज जागतिक पाणथळ जागा दिन आहे. अशा जागांचं संरक्षण आणि त्याबाबतची आस्था व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करायची प्रथा १९७१ सालापासून सुरु आहे. इराणच्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी या दिवसानिमित्त पहिलं रामसर अधिवेशन झालं होतं. वनस्पती आणि इतर सूक्ष्म जीवांचा अधिवास असलेल्या जल परिसंस्था या केवळ जलसाठेच नव्हेत तर संपूर्ण पर्यावरणाला विपुल प्रमाणात पर्यावरणीय आरोग्य प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.