July 6, 2025 1:29 PM

views 14

उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा, गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

दिल्लीतील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे तीव्र उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी ८ जुलैपर्यंत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान सुरूच आहे. आज सकाळपासून राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने मंडी, कांग्रा आणि सिरमौर जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तसंच शिमला, सोलन, हमीरपूरसह नऊ जिल्ह्यांमध्ये पुढल्या २४ तासांसाठी पुराची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार...

July 2, 2025 3:05 PM

views 15

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात मौसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मुंबईतल्या बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड या उपनगरात दक्षिण मुंबईच्या तुलनेनं अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी स...

May 25, 2025 8:21 PM

views 15

नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल; किनारी भागांना रेड अलर्ट

नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल झाला आहे परिणामी कर्नाटकच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला आहे. मंगळुरू, पनंबूर आणि कारवार इथं सर्वाधिक पाऊस पडला. हवामान विभागानं किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात, सतत पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांब खराब झाले आहेत. नेत्रावती, कुमारधारा आणि फाल्गुनी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.   उत्तर कन्नड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उंच लाटा उसळत असताना बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सा...

September 11, 2024 2:29 PM

views 14

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.   गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे....

July 1, 2024 1:28 PM

views 26

राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला. अजिंठा लेणीतल्या सहस्त्रकुंड धबधब्यासह लहान - मोठे नाले खळखळून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही आठवडा भराच्या विश्रांती नंतर काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुकत असलेल्या पिकांना नव संजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांतल्या काही ...