July 2, 2025 3:05 PM July 2, 2025 3:05 PM
10
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
राज्यात मौसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मुंबईतल्या बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड या उपनगरात दक्षिण मुंबईच्या तुलनेनं अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी स...