December 16, 2025 8:46 PM December 16, 2025 8:46 PM
4
मेस्सीच्या दौऱ्यात झालेल्या गोंधळप्रकरणी पश्चिम बंगालच्या क्रिडामंत्र्यांचा राजीनामा
पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून अरुप बिश्वास यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. हे खातं आता ममता बॅनर्जी यांच्याकडे असेल. बिश्वास हे ऊर्जा मंत्री म्हणून मंत्रीमंडळात कायम राहतील. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या उपस्थितीतल्या कार्यक्रमात झालेल्या गैरव्यवस्थापनामुळं क्री़डामंत्री बिस्वास यांनी राजीनामा दिला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारनं पोलिस महासंचालक आणि सॉल्ट लेक स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त...