October 14, 2025 8:15 PM October 14, 2025 8:15 PM

views 43

वेस्ट इंडिज विरुद्धची कसोटी मालिका भारतानं जिंकली

क्रिकेटमधे वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं ७ गडी राखून जिंकला. या विजयामुळं भारतानं ही मालिकाही २-० अशी जिंकली आहे. वेस्ट इंडिज विरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग १० वा विजय आहे. या सामन्यात कुलदीप यादव सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला, तर मालिकावीराचा मान रविंद्र जाडेजाला मिळाला.

October 13, 2025 8:14 PM October 13, 2025 8:14 PM

views 36

वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला ५८ धावांची गरज

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात विजयासाठी भारताला आणखी ५८ धावा कराव्या लागणार आहेत. फॉलोऑननंतर आज चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजनं पहिल्या डावातली पिछाडी भरून काढली, आणि दुसऱ्या डावाअखेर १२० धावांची आघाडी घेतली. कालच्या २ बाद १७३ धावावरून वेस्ट इंडिजनं आज पुढं खेळायला सुरुवात केली. जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी १७७ धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला डावाच्या पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढलं. कॅम्पबेलनं ११५, तर शाई होपनं १०३ धावा केल्या. ३९० धावांवर त्यांचा डाव संपला. &nb...

October 10, 2025 9:49 AM October 10, 2025 9:49 AM

views 186

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरी क्रिकेट कसोटी आजपासून दिल्लीत

भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम सामना आजपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. या आधीचा सामना भारताने जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फटकावलेल्या 94 धावा विशेष लक्षवेधी ठरल्या.

March 15, 2025 3:16 PM March 15, 2025 3:16 PM

views 25

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग: वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा ६ धावांनी पराभव

क्रिकेटमध्ये रायपूर इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर सहा धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे.

December 22, 2024 8:26 PM December 22, 2024 8:26 PM

views 27

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २११ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला २११ धावांनी पराभूत करत या मालिकेत दणदणीत विजयी सलामी दिली.    वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.     विजयासाठी ३१५ धाव...

December 22, 2024 7:16 PM December 22, 2024 7:16 PM

views 13

पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचं वेस्टइंडिजला ३१५ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजपुढे ३१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.  

December 20, 2024 6:18 PM December 20, 2024 6:18 PM

views 234

वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२० मालिका भारतीय महिला संघानं जिंकली

महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली.   भारतानं दिलेलं २१८ धावांचं लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५७ धावा करु शकला. भारताकडून राधा यादव हिने चार गडी बाद केले. ऋचा घोषने महिलांच्या टी-२० क्रिकेट प्रकारात आजवर सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. तिने अवघ्या १८ चेंडुंत ५० धावा केल्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर...

December 20, 2024 11:14 AM December 20, 2024 11:14 AM

views 11

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेस्टइंडिजवर विजय

महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्टइंडिजचा तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी टी-ट्वेंटीमधील आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधनानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. रिचानं केवळ 18 चेंडूत पन्नास धावा काढून विक्रम केला, ती सामनावीर ठरली. उत्तरादाखल वेस्टइंडीज संघ 20 षटकात 9 बाद 157 धावाच करु शकला. स्मृती मंधनाला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. उभय संघांमध्ये पन्नास षटकांची मालिका परवा 22 त...

December 19, 2024 10:01 AM December 19, 2024 10:01 AM

views 39

महिला क्रिकेट : भारत-वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा सामना नवी मुंबईत होणार

भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा तिसरा सामना आज नवी मुंबईत खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकून बरोबरी केली आहे.

December 18, 2024 11:10 AM December 18, 2024 11:10 AM

views 11

महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडिजचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या २० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघाची १-१ अशी बरोबर झाली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हैले मॅथ्यूजनं ८५ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारतानं वेस्टइंडिजसमोर १६० धावाचं लक्ष्य ठेवलं होतं.