October 12, 2025 7:35 PM October 12, 2025 7:35 PM
41
पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
पश्चिम बंगालमध्ये, एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींना दुर्गापूर न्यायालयानं आज दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनी ओदिशा इथली असून, ती गेल्या शुक्रवारी आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या परिसराबाहेर गेली होती. त्यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांच्या सुरक्षिततेवरून केलेल्या वक्तव्यावर टीका होत आहे.