January 24, 2025 9:11 AM

views 22

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्र्यांनी काल दावोसमधून दूरस्थ प्राणलीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईतून सहभागी झाले होते. दावोसमध्ये गुंतवणू...

January 23, 2025 7:08 PM

views 39

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंचा सवाल

दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २९ पैकी २८ कंपन्या भारतातल्या आहेत. २८ पैकी २० राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. २० पैकी १५ मुंबईतल्या, ४ पुण्यातल्या, एक ठाण्यातली आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं आहे.  दावोसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळं इथे येणं आवश्यक असल्याची प्रतिक्रि...