January 21, 2026 12:33 PM

views 9

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात AI चा प्रसार करण्याचा भारताचा प्रयत्न – मंत्री अश्विनी वैष्णव

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे . ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफरी या सत्रात बोलत होते. ग्राफीक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता असणं एआयच्या प्रसारासाठी आवश्यक आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे सरकार ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैष्णव म्हणाले. आतापर्यंत ३८ हजार जीपीयू पॅनलमधे समाविष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं. ...