January 24, 2025 8:55 PM

views 25

जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध – मंत्री सी आर पाटील

जलसंवर्धनासाठी भारत वचनबद्ध असून या अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणत आहे, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी म्हटलं आहे. दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत ते बोलत होते. देशानं अथक परिश्रम करून आपले जलस्रोत लक्षणीय रित्या मजबूत केले आहेत आणि शाश्वत जल व्यवस्थापनात एक जागतिक आधारभूत मापदंड स्थापन केला आहे, ग्रामीण भारतात शुद्ध पेय जल पोहोचवण्यात केंद्र सरकारनं मोठं यश मिळवलं आहे, असं ते म्हणाले.

January 17, 2025 7:23 PM

views 11

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारी या काळात दावोसला जाणार आहेत. राज्याच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.