September 13, 2024 8:43 AM September 13, 2024 8:43 AM
9
एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार
एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात आज सामंजस्य करार झाला. ‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं मुंबईत प्रकाशन झालं. त्यावेळी हा करार झाला. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण म...