September 15, 2025 10:23 AM September 15, 2025 10:23 AM

views 25

महाराष्ट्रासह देशाच्या इशान्ये कडील राज्यांना पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि इशान्ये कडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.   तर उद्या विदर्भ, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, नागालँड, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार पावासाचा इशाला दिला आहे. राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस राज...

November 30, 2024 3:25 PM November 30, 2024 3:25 PM

views 9

राज्यात नोव्हेंबर महिन्यातच गारठा वाढला

राज्यात नोव्हेंबर महिन्यातच थंडीची तीव्र लाट पसरली आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सर्वाधिक गारवा जाणवत असून जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा कमी राहिलं. येत्या तीन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. राज्यभरात तापमानात लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. विदर्भातही तापमान कमी असून,...

September 25, 2024 8:28 PM September 25, 2024 8:28 PM

views 15

उद्या राज्यातील काही जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी  आणि पुणे या जिल्ह्यांसाठी उद्या सकाळपर्यंत हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाची दाट शक्यता असून उदया नाशिकमधे रेड अलर्ट दिला आहे. येत्या दोन दिवसांत पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पावसाची परतीची रेषा कायम असून कालपासून कोकणात काही ठिकाणी, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.