August 26, 2024 1:40 PM August 26, 2024 1:40 PM

views 10

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दिवसांत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्येही हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यात, तसंच  झारखंडमध्येही पुढील...

August 24, 2024 7:37 PM August 24, 2024 7:37 PM

views 11

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता

येत्या २४ तासांत रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रत्नागिरी, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी कर...

August 24, 2024 7:30 PM August 24, 2024 7:30 PM

views 26

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे एसटी बस अडकून पडल्या आहेत. दरम्यान कर्ली आणि तेरेखोल नदी इशारा पातळी जवळून वाहत होत्या.  जालना शहरासह घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.  धुळ्यात निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीपात्रासह ...

August 23, 2024 7:18 PM August 23, 2024 7:18 PM

views 23

धुळे जिल्ह्याला आज रेड अलर्ट

धुळे जिल्ह्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस झाला. पावसामुळे धुळे आणि साक्री तालुक्यातल्या जल प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.  मालनगांव, पांझरा, जामखेली प्रकल्प भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. अक्कलपाडा धरणातून आज दुपारी २४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर आला असून नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्...

August 22, 2024 6:04 PM August 22, 2024 6:04 PM

views 14

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पावसाचा अंदाज

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्ट पर्यंत,  तर  आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढले ५ दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

August 22, 2024 1:38 PM August 22, 2024 1:38 PM

views 6

येत्या दोन दिवसात देशातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्टपर्यंत, तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढले ५ दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.

August 20, 2024 7:56 PM August 20, 2024 7:56 PM

views 9

येत्या दोन दिवसात ईशान्य भारतात मुसळधार पाऊसाचा अंदाज

येत्या दोन दिवसांच्या कालावधीत ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. बांग्लादेशाच्या मध्यवर्ती भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम तसंच त्रिपुरामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.       त्या शिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओदिशा या पूर्व भारतातल्या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  केरळ तसंच तामिळनाडू या रांज्यांसह लक्षद्वीप बेटावरच्या तुरळक ठिकाणीही मु...

August 19, 2024 11:14 AM August 19, 2024 11:14 AM

views 7

पश्चिमबंगाल, ईशान्येकडील राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बिहार, छत्तीसगड आणि दक्षिण द्वीपकल्प परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागातील शास्त्रज्ञ डॉ. नरेशकुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

August 16, 2024 7:38 PM August 16, 2024 7:38 PM

views 14

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज

येत्या दोन दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकणात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

August 13, 2024 1:45 PM August 13, 2024 1:45 PM

views 9

येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात जोरदार पाऊस

येत्या दोन दिवसांत देशाच्या मध्य, दक्षिण आणि ईशान्य भागात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी पुढले ७ दिवस जोरदार पावसाची शक्यता असून पूर्व राजस्थानमध्ये अती जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.