November 28, 2024 11:11 AM
12
येत्या शनिवारपर्यंत देशाच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता
नैऋत्य बंगालच्या उपसागरात, श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे येत्या शनिवारपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कमी दाबाच्या पट्टयाचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं. हे चक्रीवादळ शनिवारी सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू किनारपट्टीजवळ प पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरात...